لمحة عن Wayam
शालेय वयातील मुलांना ताज्या घडामोडी ، दैनंदिन विज्ञान ، ललित साहित्य ، कलाकृती ، प्रयोग ، कोडी ، उपयुक्त वेबसाइट ، इत्यादी मजकूर वाचायला मिळावा आणि त्यांनी विचारप्रवण व्हावे ، म्हणून हे मासिक सुरू केले आहे. विविध विषयांतील तज्ज्ञ "वयम्’मध्ये लिहितात. महिन्याला एका ताज्या विषयाला बहुअंगाने भिडणारे लेखही यांत असतात. "वयम्’मधील बहुतांश मजकूर मराठीत असतो आणि एक-दोन लेख / गोष्टी इंग्रजीतून असतात. रंगीत टीव्ही बघणाऱ्या आणि संगणक वापरणाऱ्या पिढीतील मुलांना आकर्षक वाटावे आणि त्यांच्यावर उत्तम डिझाइनचा संस्कार व्हावा ، यासाठी आवर्जून उत्तम प्रतीच्या कागदावर रंगीत छपाई केली जाते. ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव "वयम्’चे सुलेखन करतात. एकंदर निर्मिती- मूल्यांकडे लक्ष दिले जाते. 'वयम्' मासिकाच्या मुख्य संपादक शुभदा चौकर आहेत.
المزيد